Bookstruck

श्री..ची कविता - १

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

    श्री ..ची कविता..
-------------:-D -------------
तुझा साजन  हा वेळा खुळा
तुझीच वाट पाहात बसला
तु येशील हा त्याला विश्वास पुरा
तु आपल्याच विश्वात दंग सखी..

एकटा बसुन तो प्रतिक्षा करतो
हे वारा ही तुला सांगुन गेला..
तु नजर फिरवुन बघ एकदा
तुझा सखा तिथेच वाट पाहु लागला.

क्षण क्षण हे त्याचे चालले कसे
कसे सांगु त्या क्षणाची महती
तुझेच रूप घेऊन तो समोर..
तु येण्याचा क्षण तो वाट पाहती

सतावु नको तुझ्या सजणाला
तुझ्या प्रतिक्षेत तो हिरमुसला
जा भिगीसी , घे तु मिठीत त्याला
सोड त्याचा प्रतिक्षेची तपश्चर्या..
===================
*लेखन : श्रीधर कुलकर्णी*

Chapter ListNext »