Bookstruck

ग्रहांचे करकत्व

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रवी: रवी म्हणजे आत्मा.हा राज कारक ग्रह आहे. अधिकार पद,राज पद देणारा ग्रह आहे.मेष, कर्क,सिंह,व धनु या राशीत  बलवान असतो. दशम व लग्नात जास्त महत्व.४,६,८,१०,१२ या स्थानात राशी बली असल्यास निरर्थक. १२ वे स्थानी व्यय,४ थे स्थानी चिंता,६ मध्ये शत्रू पीडा,रवीच्या चतुर्थात शनि मोठी आपत्ती, रवीच्या दशमात शनी धंद्यात बदल. रवीच्या धन स्थानी व व्यय स्थानी शनी नसावा.

रवी,शनी यांच्या शडाष्टक योग, प्रयत्नाला यश मिळत नाही रवी मिथुन,तुला व कुंभ राशीत चांगला.रवी-बुध विद्या देणारा योग.

रवी-शुक्र यांत्रिक कला.रवीच्या दशम स्थानी मंगळ उद्योगी. रवीच्या दशमात गुरू चांगला.
रवीच्या लाभात चंद्र व्यापारात फायदा.
चंद्र--चंद्र मनाचा तसाच मातृ कारक आहे.

रवी-चंद्र,शनी-चंद्र दारिद्रदर्शक योग. चंद्र-मंगळ लक्ष्मी कारक.चंद्र-बुध बुद्धिमत्ता दर्शक. चंद्र-गुरू अतिशय महत्वाचा विपुल संपत्ती,अध्यात्मात प्रगती. लग्न,पंचम,नवम,दशम व एकादश स्थानात महत्व. कुंडलीत लग्न,रवी आणि चंद्र यांना महत्व आहे. मंगळा पासून शनी ४ था त्रासदायक.पंचमात संततीस अडथळा.

मंगळ:- अधिकार, आत्मविश्वास,दंत वैद्य, शल्य विशारद, सैनिक,पोलिस, गुप्तहेर, याचा कारक,मंगळाला सेनापती म्हणतात,वायू राशीत असल्यास, एअर फोर्स,लग्न,व्यय,चतुर्थ,सप्तम,अष्टम,या स्थानी नसावा.५ वे स्थानी संततीस त्रास.

मेष, सिंह, धनु ह्या राशी व अश्विनी,मघा,मूळ यातील मंगल मनुष्याला कुळदीपक बनवितो. कुंभ राशीत तत्त्ववेत्ता,१,३,६ या स्थानी साहस,शौर्य.दशमातील मंगळ, मोठाले उद्योग,समर्थयापेक्षाही मोठे उद्योग हाती घेतो. या स्थानात मेष,सिंह,धनु व मकर या राशीचा मंगळ असावा.

« PreviousChapter ListNext »