Bookstruck

दुर्दैवी जोडपे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका माणसाची बायको फार भांडखोर होती. कर्कश आवाजात आरडाओरडा करून ती सतत नवर्‍याशी भांडत असे. एकदा ती माहेरी गेली होती. तेथून परत आल्यावर नवर्‍याने तिला विचारले. 'तू तिथे मजेत होतीस ना ?

तेव्हा बायको म्हणाली, 'माझ्या माहेरी मी आल्याने कुणालाच आनंद झाला नाही. तिथली गडीमाणसं सुद्धा मला कंटाळली होती, असं त्याच्या चेहेर्‍यावरून वाटत होतं !'

त्यावर तिचा नवरा म्हणाला, 'आता तूच पहा, की, सगळा दिवस बाहेर कामात घालवणार्‍या गडीमाणसांनासुद्धा तुझा कंटाळा आला तर सगळा काळ तुझ्याच सहवासात काढणारा मी तुझ्या स्वभावाला किती बरं कंटाळत असेन ?'

तात्पर्य

- आपण जेव्हा सगळ्यांना अप्रिय होतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचाच दोष असला पाहिजे असे समजून आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे.
« PreviousChapter ListNext »