Bookstruck

गरुड व घुबड

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक गरुड आणि घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. परंतु एक दिवस, त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरविले, तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले. तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले, 'मित्रा ! परंतु, माझी पिल्लं कशी आहेत ते तुला माहित आहे का ? नाहीतर दुसर्‍याचीच आहेत असे म्हणून तू त्यांना खाऊन टाकशील.'

गरुड म्हणाला, 'माझी पिल्लं खूप सुंदर आहेत. त्यांचे डोळे, पिसं, आवाज सगळंच खूप सुंदर आहे. आता येईल ना तुला ओळखता ?'

पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली. ती पाहून तो म्हणाला, 'किती घाणेरडी आणि कुरूप पिल्लं आहेत ही. घुबडाची पिल्लं तर खूप सुंदर आहेत. म्हणजे ही काही घुबडाची पिल्लं नसणार. यांना मारून टाकावं.

असे म्हणून त्याने सगळ्या पिलांचा फडशा उडवला.

नंतर घुबडाने येऊन पाहिले तो ढोलीत पिल्ले नाहीत. ते गरुडास म्हणाले, 'मित्रा, तूच माझी पिल्लं खाल्लीस.'

गरुड म्हणाला, ' हो, मी खाल्ली; पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्लं तुझी आहेत म्हणून ? तू तर म्हणालास की, माझी पिल्लं खूप सुंदर आहेत. मला वाटलं ती दुसर्‍याच पक्ष्याची आहेत. आता यात माझी काय चूक ?

तात्पर्य

- स्वतःची खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो.
« PreviousChapter ListNext »