Bookstruck

रानडुक्कर आणि गाढव

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके दिवशी एक रानडुक्कर आणि एक गाढव यांचे चांगलेच भांडण जुंपले. रानडुकराला वाटले, आपल्याला सुळे आहेत, शिवाय आपले डोकेही गाढवापेक्षा मोठे आहे. आपण त्याला सहज मारू शकू. म्हणून तो गाढवाच्या अंगावर चालून गेला. डुकराच्या तीक्ष्ण सुळ्यांपुढे आपण टिकणार नाही हे ओळखून गाढवाने त्याच्याकडे पाठ केली आणि त्याला जोराजोरात लाथा मारायला सुरवात केली. डुकराची अगदी गाळण उडाली. तेव्हा तो गाढवाला म्हणाला 'अरे, हे काही योग्य नाही. समोरासमोर टक्कर द्यायची सोडून तू लाथा मारशील असं मला वाटलंही नाही.

तात्पर्य

- स्वतःच्या शक्तीवर अधिक विश्‍वास ठेवू नये.
« PreviousChapter ListNext »