Bookstruck

गाढव आणि लांडगा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, 'वैद्यबुवा ! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून द्या.' लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते मजेने निघून गेले.

तात्पर्य

- काही माणसे इतकी कृतघ्न असतत, की ज्याने आपल्याला संकटातून वाचविले त्याच्याशीसुद्धा ते शिष्टपणे वागतात.
« PreviousChapter ListNext »