Bookstruck

कवडा आणि कोंबडा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका मनुष्याने एक कवडा जाळ्यात पकडला. त्या माणसाने एका कुंपणात बर्‍याचशा कोंबड्या ठेवल्या होत्या. त्यांच्यात त्या कवड्याला नेऊन सोडले. या नवीन पाहुण्याला पाहून कोंबड्यांनी त्याला टोचून टोचून खूप त्रास दिला. यानंतर थोड्या वेळाने ते कोंबडे जेव्हा एकमेकांच्यात भांडू लागले तेव्हा कवडा म्हणाला-

'हे जर आपआपसांतच इतकी मारामारी करतात तर माझ्यासारख्या परक्याला त्रास दिला यात काहीच आश्चर्य नाही.'

तात्पर्य

- जे मूळचेच भांडखोर असतात, त्यांच्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा कधी करू नये.
« PreviousChapter ListNext »