Bookstruck

लहान मासा मोठा मासा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक मोठा मासा एका लहान माशाच्या मागे लागला. तो लहान मासा घाबरून, जीव घेऊन उथळ पाण्यात शिरला. परंतु तेथेही तो मासा त्याचा पाठलाग करीत आला. ते पाहून त्याने किनार्‍याकडे धाव घेतली व अगदी कडेवर येताच लाटांमुळे तो वाळूत येऊन पडला. मोठा मासाही त्याच्या मागे मागे किनार्‍याकडे येऊन लाटेच्या तडाख्याने वाळूत पडला व दोघेही तळमळू लागले. तेव्हा लहान मासा म्हणाला, 'मी जसा मरणार तसाच माझा शत्रूही मरणार हे पाहून मला फार समाधान वाटतं आहे.'

« PreviousChapter ListNext »