Bookstruck

म्हातारे मांजर आणि उंदीर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक मांजर खूप म्हातारे झाले होते. त्यामुळे त्याच्या अंगी उंदरांची शिकार करण्याची शक्ती राहिली नाही म्हणून ते घरात धान्याच्या पोत्यामागे हळूच लपून बसले. त्या पोत्यातील धान्य खाण्यासाठी रात्री उंदीर येत असत. परंतु, एका म्हातार्‍या उंदराने ते पाहिले व इतरांना सांगितले. त्यामुळे एकही उंदीर त्या पोत्यापाशी आला नाही. अशा रीतीने मांजराची युक्ती फसली.

तात्पर्य

- कपट कधीतरी उघडकीस येतेच.
« PreviousChapter ListNext »