Bookstruck

शेळी, करडू आणि लांडगा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक शेळी चरण्यासाठी रानात निघाली तेव्हा तिने आपल्या करडास सांगितले. 'बाळ, आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे आणि मी, 'सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो' असं म्हटलं की दार उघड. इतर कोणाला दार उघडू नको !'

हे सर्व बोलणे एक लांडगा ऐकत होता. शेळी निघून गेल्यावर तो खोपटाच्या दाराशी येऊन म्हणाला, 'सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो !'

त्याला वाटले आता करडू दार उघडेल. परंतु त्याचा आवाज करडाने ओळखला व ते खिडकीतूनच लांडग्याला म्हणाले, 'तू जर बोकड आहेस तर तुला दाढी कशी नाही ?'

हा प्रश्न ऐकून लांडगा निमूटपणे निघून गेला.

तात्पर्य

- फसवेगिरी करणार्‍या माणसासंबंधी नेहमी सावध असावे.
« PreviousChapter ListNext »