Bookstruck

म्हातारी आणि वैद्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एका म्हातारीच्या डोळ्यात फूल पडल्यामुळे तिला काही दिसेनासे झाले. म्हणून तिने एका चांगल्या वैद्यास आपले डोळे दाखविले. परंतु तो वैद्य लबाड होता. प्रत्येक दिवशी औषध देण्यासाठी म्हातारीच्या घरी येऊन डोळे बांधून, जाताना म्हातारीच्या घरातली काहीतरी वस्तू तो घेऊन जात असे. असे होता होता सारे घर रिकामे झाले. हळूहळू बाईचे डोळेही बरे झाले व तिला दिसू लागले. वैद्याने तिच्याजवळ डोळे बरे केल्याबद्दल पैसे मागितले. तेव्हा बाई म्हणाली, 'माझे डोळे तर पूर्वीपेक्षा जास्त बिघडले आहेत. तेव्हा पैसे कसले ?'

वैद्याने म्हातारीवर फिर्याद केली. तेव्हा न्यायाधीशासमोर ती म्हणाली, 'साहेब, हा वैद्यबुवा माझ्या घरी येण्यापूर्वी मला माझ्या घरातल्या वस्तु चांगल्या दिसत होत्या. परंतु आता मात्र माझ्या घरातली एकही वस्तु मला दिसत नाही याचा अर्थ काय ?'

हे ऐकताच न्यायाधीशाच्या लक्षात सगळा प्रकार आला व त्याने तिच्या सगळ्या वस्तु परत देण्याचा हुकूम दिला.

तात्पर्य

- लबाडीचे वागणे कधीही लपून रहात नाही.
« PreviousChapter ListNext »