Bookstruck

सिंह गाढव आणि कोंबडा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

असे म्हणतात की कोंबड्याच्या आवाजाला सिंह फार भितो. एकदा एके ठिकाणी एक गाढव आणि एक कोंबडा चरत होते. तेव्हा एक सिंह तेथे आला. त्याला पहाताच कोंबड्याने जोरात आवाज केला. ते ऐकून सिंह भीतीने पळत सुटला. गाढवाला वाटले की आपल्यालाच भिऊन सिंह पळतो आहे. म्हणून तो सिंहाचा पाठलाग करू लागला. थोड्या अंतरावर गेल्यावर सिंह मागे वळाला आणि पंजाच्या एकाच फटकार्‍यात त्या गाढवाला त्याने ठार मारले.

तात्पर्य

- एखादा थोर पुरुष एखाद्या कारणाने घाबरू लागला तर तो आपल्यालाच भीत आहे असे समजून त्याला त्रास देण्याचा प्रयत्‍न करतात ते मूर्ख असतात.
« PreviousChapter ListNext »