Bookstruck

आपली माणसं

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

सध्याच्या जगात आपली माणसं ओळखण फार कठीण झालं आहे पण ते गरजेचं सुद्धा आहे, त्याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. मदतीपेक्षा आपल्या शेजारच्या माणसाचा (घरी, कंपनीत, प्रवासात, समारंभात) आपल्याला फायदा कसा होईल हे पाहणारी माणसे सुद्धा बरीच आहेत.
नातेसंबंध जोडण तितकस सोप नसतं पण अशक्यही नाही. संबंध जुळल्यानंतर त्याकडे योग्यवेळी आठवण काढून ती टीकवून ठेवण फार महत्त्वाचे. आजकाल फक्त What's app, Facebook, Twitter, Instagram यावर कोणाचे मित्र जास्त यातच चुरस लागलेली असते, पण त्याच यादीतील कितीजणांना तुम्ही आठवणीत जपता याला जास्त किंमत आहे.
आपल्या लोकांची आठवण काढणे याकडे फक्त एक गुंतवणूक म्हणून न पाहता, मनमोकळेपणाने गप्पा मारण्याच सुख अनुभवा.
पूर्वी माणसं एकमेकांना भेटायची, सुख दुःख बोलून दाखवायची, तब्बेतीची विचारपूस व्हायची पण आजकाल भेटण तर दुरच साधी आठवण सुद्धा येत नाही हो जवळच्या माणसांची. समोरुन विचारणं होत नाही ना, मग आपणच का नेहमी पुढाकार घ्यायचा? असा बालीश हट्ट धरुन आपण आपल्याच माणसांपासून कोस दूर जातो. कधीतरी लावायचा फोन स्वताःहून मित्राला, नातेवाईकांना बर वाटत. भारतीय संस्कृतीप्रमाणे आणि पूर्वजांच्या वळणानुसार काय ते आपण सणवाराच्या दिवशी आपल्या लोकांकडे जातो पण हेच जाणयेण एक शिष्टाचार म्हणून न राहता, एक आपुलकी निर्माण व्हावी हीच काय ती देवाकडे प्रार्थना.

Chapter List