Bookstruck

शहाणा गाढव

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

एक म्हातारा आपले गाढव चारीत असतां त्याचा शत्रू त्या ठिकाणी आला. तेव्हा तो म्हातारा आपल्या गाढवाला म्हणाला, 'मित्रा, चल आपण पळून जाऊ.' त्यावर ते गाढव म्हणाले, 'अरे, तुझा तो शत्रू माझ्या पाठीवर काठी का घालत नाही?' म्हातारा म्हणाला, 'अरे, तोही तुझ्या पाठीवर काठी घालील, यात काही संशय आहे का?' गाढव म्हणाले, 'असं जर असेल तर मी इथून बिलकूल हालणार नाही. माझ्या नशीबातली काठी चुकत नसेल तर माझा मालक कोणी का असेना?'

तात्पर्य

- आपल्या स्थितीत जर काही फरक पडत नसेल तर कोणाचीही चाकरी करायला हरकत नाही.
Chapter ListNext »