Bookstruck

ससा आणि चिमणी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एक गरुड पक्षी एका सशाच्या मागावर टपून बसला होता. तिथे जवळच झाडावर एक चिमणी बसली होती. ती सशाला म्हणाली, 'अरे, तू किती मूर्ख आहेस ? तू एवढा चपळ असताना घाबरतोस का ? तू जर प्रयत्‍न करशील तर या गरुडाच्या हातून तू सहज सुटशील. चल ऊठ, पळ !' असं ती बोलत होती. इतक्यात एका ससाण्याने झडप टाकून तिला पकडले. तेव्हा ती केविलवाणे ओरडू लागली. ते पाहून ससा तिला म्हणाला, 'स्वतः एवढा धीटपणाचा आव आणून तू मला हिणवत होतीस, आता तू आपला जीव कसा वाचवतेस ते पाहू !'

तात्पर्य

- दुसर्‍याला शहाणपण शिकवणारे लोक स्वतः संकटात पडले की त्यांचे शहाणपण निरुपयोगी ठरते.
« PreviousChapter ListNext »