Bookstruck

महाभारतातील अप्सरांचे संदर्भ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महाभारतात वनपर्वात अर्जुन व उर्वशीमधील संवाद येतो. उर्वशी ही कुरुवंशातील राजा पुरुरव्याची पत्‍नी असल्याने आणि अर्जुन हा पुरूरव्याचा वंशज असल्याने, कामातुर उर्वशीचा स्वीकार करण्यास अर्जुन नकार देतो. यावर उर्वशी सांगते, "अप्सरा या नीतिनियमांतून मुक्त असून आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरुष निवडतात. यामुळे मी जरी कुरुकुलातील तुझी पूर्वज असले तरी कालांतराने जी पुरूरव्याची मुले-नातवंडे येथे स्वर्गात आली त्या सर्वांनी माझ्याशी संग केला आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर."

अर्जुन या मागणीचा अव्हेर करतो. तेव्हा संतप्त होऊन उर्वशी त्याला शाप देते. हा शाप पुढे बृहन्नडेच्या रूपाने खरा ठरतो.

याप्रमाणे अनुशासनपर्वात पंचचूडा या अप्सरेची व शांतिपर्वात घृताची या अप्सरेची कथा येते. घृताचीच्या कथेत अप्सरांना आपले रूप पालटण्याची विद्या अवगत असल्याचे दिसते.

« PreviousChapter ListNext »