Bookstruck

लांडगा आणि बगळा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एका लांडग्याच्या गळ्यात बोकड मारून खाताना त्याचे हाडूक अडकले, त्यामुळे लांडग्याचा जीव कासावीस झाला. भेटणार्‍या प्रत्येक प्राण्याला ते हाडूक काढून देण्यासाठी विनवू लागला. तसेच ते काढून देणार्‍याला बक्षीसह देण्याचे त्याने कबूल केले. तेव्हा एक बगळा बक्षीसाच्या आशेने ते काढून देण्यास तयार झाला. त्याने आपल्या लांब चोचीने ते हाडूक काढून दिले. नंतर तो बक्षीस मागू लागला. तेव्हा रागाने लांडगा त्याला म्हणाला, 'तू किती मूर्ख आहेस. तू माझ्या तोंडात मान दिली होतीस तरी ती न चावता मी तुला जिवंत सोडलं, हे बक्षीस कमी आहे का?'

तात्पर्य

- दुष्टांवर उपकार केले तरी ते त्याची फेड अपकारांनीच करतात हे आपण विसरू नये.
« PreviousChapter ListNext »