Bookstruck

कुत्रा आणि त्याचा मालक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एका माणसाचा कुत्रा हरवला. तेव्हा त्याने 'माझा कुत्रा सापडून देणार्‍यास बक्षिस देईन' अशी जाहिरात दिली. काही दिवसांनी एक माणूस त्या कुत्र्याला घेउन आला तेव्हा कुत्र्याचा मालक कुत्र्याला म्हणाला, 'अरे, तू किती कृतघ्न आहेस ! मी तुला कधी मारल नाही, शिव्या दिल्या नाहीत. तरी तू पळून गेलास?' तेव्हा कुत्र्याने उत्तर दिले. 'हे तू स्वतः केलं नाहीस हे खरं पण मला अनेक वेळा तुझ्या नोकराने मारलं आहे. ते तुझ्याच हुकुमावरून असणार हे मला माहीत आहे.'

तात्पर्य

- एखाद्या मनुष्याने दुसर्‍याकडून एखादी गोष्ट करवून घेतली तरी ती त्याने स्वतःच केली असे समजावयास हरकत नाही.
« PreviousChapter ListNext »