Bookstruck

दैव आणि गावंढळ मनुष्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक मनुष्य बर्‍यापैकी श्रीमंत होता. परंतु तो त्यात समाधानी नव्हता. काही व्यापारी लोकांनी थोड्या वेळात हजारो रुपये मिळवलेले पाहून तसेच करण्याचे त्या माणसाने ठरवले. सुदैवाने व्यापारात त्याला पुष्कळच पैसा मिळाला. तेव्हा त्याने त्याचे श्रेय आपल्या चातुर्याला आणि उद्योगाला दिले. पुढे काही दिवसांनी त्याचे नशीब फिरले आणि त्याला दररोजचे जेवणही मिळणे अशक्य झाले. तेव्हा तो दुःखाने म्हणाला, 'हे सगळे माझ्या दैवाचे खेळ आहेत.'

तेव्हा दैव त्याला म्हणाले, 'अरे बाबा, जेव्हा तुला पैसा मिळाला तेव्हा तुला माझी आठवण आली नाही. पण तुला दारिद्र्य येताच तुझ्या दुःस्थितीचं खापर मात्र तू माझ्यावर कसं फोडतोस ?'

« PreviousChapter ListNext »