Bookstruck

सिंह आणि तीन बैल

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तीन बैलांची मैत्री होती. ते नेहमी बरोबरच चरण्यासाठी जात असत. हे पाहून एक सिंह मनात म्हणाला, 'यातून एखादा बैल आपल्याला खायला मिळाला तर बरं होईल.' त्यापैकी एकट्या बैलाला मारणे सिंहाला सहज जमले असते. पण तिघे एकजुटीने राहात असता त्यांच्यावर उडी घालण्यास त्याला होईना. मग त्याने एकमेकासंबंधीच्या खोट्यानाट्या चहाड्या सांगून त्या बैलात फूट पाडली व त्यामुळे ते आपसात एकमेकांचा द्वेष करू लागले. मग ते तिघे निरनिराळ्या ठिकाणी चरत असत सिंहाने तिघांना मारून खाल्ले.

तात्पर्य

- एकीपुढे शत्रूचे काही चालत नाही. तेव्हा शत्रू आपल्या विरुद्ध चहाड्या सांगून फूट पाडण्याचा प्रयत्‍न करतो. अशा वेळी माणसाने फार सावध राहावे.
« PreviousChapter ListNext »