Bookstruck

लांडगा, कोल्हा व वानर

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

एका वानराला न्यायाधीश करून त्याच्यापुढे लांडग्याने कोल्ह्यावर चोरीची फिर्याद केली. त्या न्यायालयाची मजा पाहायला इतर प्राणीही जमले. लांडग्याचे भाषण संपल्यावर कोल्ह्याने जबाब दिला की, 'मी लांडग्याची वस्तू चोरली नाही.' नंतर खटल्याचा विचार करून व पुरावा वाहून वानराने निकाल दिला. तो लांडग्याला म्हणाला, 'अरे, तुझी स्वतःची अशी कोणतीही वस्तू गेली नाही व कोल्ह्याला म्हणाला, 'तू चोरी केलीस यात मुळीच संशय नाही,' याप्रमाणे ते दोघे लबाड असे ठरवून सभा संपली.

तात्पर्य

- लबाड म्हणून ज्याची एकदा प्रसिद्धी झाली त्याचे म्हणणे कोणी खरे मानत नाही.
Chapter ListNext »