Bookstruck

बोकड आणि कुत्रा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके दिवशी एका धनगराच्या घरी मेजवानी होती, म्हणून एक बोकडाला मारण्यासाठी त्याने त्याचे कान धरून आपल्याकडे ओढले. तेव्हा बोकड धडपडत ओरडू लागले. ते पाहून जवळच धनगराचा कुत्रा होता, तो बोकडाला म्हणाला, 'अरे आपला मालक माझे कान नेहमी धरतो, पण मी कधी आवाज करत नाही. आणि आज एकदा तुझे कान धरताच तू इतका धडपडतोस ते काय म्हणून ?' त्यावर बोकड म्हणाला, 'अरे, आपला मालक तुझे कान धरतो, तेव्हा त्याला तुला जवळ घेऊन तुझे लाड करायचे असतात आणि त्याने माझे कान धरले ते मला जवळ ओढून ठार मारण्यासाठी.'

तात्पर्य

- एकच गोष्ट वेगवेगळ्या हेतूने केली असता तिचे परिणामही वेगळेच होतात.
« PreviousChapter ListNext »