Bookstruck

करडू व लांडगा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक करडू खोपटावर चढले होते. त्या खोपटाखाली एक लांडगा उभा होता. त्याला ते शिव्या देऊ लागले तेव्हा तो लांडगा त्याला म्हणाला, 'अरे पोरा, हे वाईट शब्द तू उच्चारत नाहीस तर ज्या खोपटावर तू चढून बसला आहेस, ते खोपट उच्चारत आहे.'

तात्पर्य

- काही लोकांच्या अंगी शत्रूशी दोन हात करण्याची शक्ती नसल्याने ते घाबरून असतात. पण दुसर्‍याचा आश्रय मिळाला म्हणून शत्रूचे आता काही चालणार नाही असे त्यांना वाटले म्हणजे ते शत्रूचा उपहास करतात व शिव्या देतात.
« PreviousChapter ListNext »