Bookstruck

गाढव व माळी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शहराजवळच्या वस्तीवर राहणार्‍या गाढवाचे शेपूट एके दिवशी कोठेतरी तुटून पडले.

शेपटी नसल्याने त्या गाढवाला स्वतःची फार लाज वाटू लागली. तो आपली शेपटी शोधण्यासाठी म्हणून हिंडू लागला. तो एका बागेतून चालला असता तेथील माळ्यास वाटले की हे गाढव आपल्या फुलझाडांची नासाडी करण्यासाठीच आले आहे. म्हणून तो रागारागाने त्या गाढवाच्या अंगावर धावून गेला व त्याने झाडे कापायच्या कात्रीने गाढवाचे दोन्ही कान कापून टाकले.

शेपूट हरवल्यामुळे आधीच दुःखी झालेल्या त्या गाढवाचे दोन्ही कान गेले म्हणून त्यास फारच दुःख झाले.

तात्पर्य

- दुःखाच्या भरात अविचाराने एखादी गोष्ट केली जाते व त्यामुळे जास्तच संकटे निर्माण होतात.
« PreviousChapter ListNext »