Bookstruck

शेतकरी व त्याचा कुत्रा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक शेतकरी शेतातील काम आटपून घरी आला तेव्हा त्याचे झोपी गेलेले मूल पाळण्यात पालथे पडले होते व त्याचे सर्व कपडे रक्ताने माखले होते. जवळच त्याचा कुत्रा बसला होता.

ते दृश्य पाहून शेतकर्‍यास असे वाटले की, कुत्र्यानेच आपले मूल मारले. म्हणून त्याने रागाच्या भरात हातातील कुदळ कुत्र्याच्या डोक्यात घालून त्याचे प्राण घेतले.

नंतर पाळण्याजवळ जाऊन पाहतो तो तेथे एक मोठा भयंकर साप मारून टाकलेला दिसला. तेव्हा कुत्र्याने आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठीच या सापाचे तुकडे करून टाकले असावे ही गोष्ट शेतकर्‍याच्या लक्षात आली व अशा विश्‍वासू प्राण्यास आपण रागाच्या भरात निष्कारण ठार मारले याबद्दल त्याला फार दुःख झाले.

तात्पर्य

- रागाच्या भरात एखादे अविचारी कृत्य होण्याची शक्यता असते. अशा वेळी विवेकबुद्धी अवश्य जागृत ठेवली पाहिजे.
« PreviousChapter ListNext »