Bookstruck

भारताची भुमी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दिनेश हरिभाऊ दाभाडे
कन्नड, जिल्हा-औरंगाबाद
9404590560
 
भारताची भुमी म्हणजे
एकतेचे प्रतिक आहे,
हिंसा,गुलामगिरी,...
भ्रष्टाचार हटवित आहे

सिमेवर भारताच्या
धाडसी सैनिक आहेत,
शञुला हटवित आहेत
देशाला सावरीत आहेत

येथेच आहेत किती
मोठ्याच चालीरीती,
हिच आहे  काया
जेथून मिळते माया

अनेक भाषा आणिक
अनेक वेशभुषा,
मान अभिमान ठेवून
गातोय विजयगान

गारावलेली हिरवळ येथे
पाखरांची वर्दळ येथे,
पृथ्वीलाच जणू घातला
सप्तरंगी श्रुंगार येथे

सृष्टी ही भारताची
फारच सुंदर आहे,
जगी हे ईश्वराच
मानलेलं अंगण आहे

खेळाडू, लेखक,कवी,
अन् सारे कलाकार,
योद्धे हे भारताचे
आहेत  शिल्पकार

आम्हीच सारे गाऊ
आमचेच सारे भाऊ,
प्रेमळ,विश्वासू आणि  
उल्हासी सारे राहू

दृष्ट अन् बोथटल्यांना
मिळतोय आकार आहे,
भारताची भुमी म्हणजे  
विश्वात...विश्वासी प्राण आहे.

« PreviousChapter ListNext »