kavita
आपले
जवळच्यांचा होतो त्रास
पण वेळ निघून गेल्यावर कळते
लांबचे आपले वाटणे हा निव्वळ आभास
रोज ठरलेल्या लोकांशी बोलल्याशिवाय
दिवस जात नाही
पण आपल्या माणसांशी बोलायला
साधा वेळ मिळत नाही
चौकोनात अडकलाय माणूस
आपल्या वलयाला सोडून
खरंच गरज आहे का त्या चौकोनाची
घ्या ना तुमचे वलय जोडून!!!!!!!
............
तेजस्विनी परंडकर