तू ध्येयवादी हो...
तू ध्येयवादी हो...
बघ तुझ्या जीवनात
एक ध्येय असायला हवं
ते साध्य करुन दाखवण्याचं
धाडस असायला हवं
यशस्वी होण्यासाठी
प्रयत्न कर
जिद्दीने कठोर
परिश्रम कर...
अपयशातुन शिक
आत्मपरिक्षण कर
चुका शोध
चुका सुधार...
तू का अपयशी झालास ?
त्याचा शोध घे...
आणि पुन्हा प्रयत्न कर
आणि झालेल्या चुका
पुन्हा होऊ देऊ नकोस
यशस्वी होण्यासाठी आधी
अपयश पचवायला शिक
अपयशातुन योग्य
धडा घ्यायला शिक
बघ, तू जीवनात
प्रयत्नवादी असायला हवं
जिद्द व परिश्रम हे तुझं
ब्रीद असायला हवं...
पाण्यात उतरल्याशिवाय पोहणं
शिकता येणार नाही
प्रयत्न केल्याशिवाय जीवनात
यशही कधी मिळणार नाही
जिद्द असेल तर पांगळाही
डोंगर चढून जाईल
परिश्रम केले तर पर्वताचं
चूर्ण करता येईल
बघ तुझ्या जीवनात
एक ध्येय असायला हवं
ते हिमालयापेक्षा उंच
सागरापेक्षा अफाट
आणि आकाशापेक्षा विशाल
असायला हवं...
बघ, तू ध्येयवादी हो
निर्भय, साहसी, वीर हो...