भास दरवळला
आताच नम्रता ने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते .सुट्ट्याचे दिवस समोरच होते. मनाची तु ... तु मै.....मै आता सुरू झाली होती .दरवर्षी प्रमाणे अजुन महिनाभर तरी सुट्ट्याच आनंद उधान वाट्याला आलं होतं.बालमनाला इवल्या इवल्या गोष्टीचा आनंद होऊं लागला आनी मनात विचाराच्या लाटा हलकेच उसळू लागल्या .विचारातली पळसाची लालबुंद फुले नूकतीच मावळली आणि रंगाचा तो मार्च महिनासुदधा संपला होता .आता मनात काहूर सुरू झाल होतं ते फक्त आजोळी जाण्याचं .एव्हाना तिला आम्ब्याच्या मोहोरची आठवण होऊन कैर्री चा मोह जडु लागला .