जिजाऊ पोटी जन्मले शिवबाळ...
सडा रक्ताचा चहुबाजुंनी पसरला
लागले ग्रहण उगवतीच्या भास्कराला
देखिला भवानी मातेने सैतानांचा खेळ
धाडला शिवनेरीवर दुश्मनांचा कर्दनकाळ
जिजाऊ पोटी जन्मले शिवबाळ....
ऐकुनी गाथा राम अर्जुनाच्या
बाहुत बळ भरले शिवबाच्या
जाणुनी व्यथा समस्थ रयतेच्या
लागे मना स्वराज्याची तळमळ
जिजाऊ पोटी जन्मले शिवबाळ....
रक्ताभिषेक घालुनी रायरेश्वरा
गनिमी काव्याचा घेऊनी सहारा
निर्मिले स्वराज्य रयतेच्या उद्धारा
दीनपतितांचे झाले प्रजापाल
जिजाऊ पोटी जन्मले शिवबाळ....
कवीःअनिकेत बळवंत मस्के
मो-७२०८६१००२३