Bookstruck

रात्र माझी (आठवण तुझी )

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

अलगद अशी रात्र
चांदण्यानी सजते
आठवणीत तुझ्या
मन माझे फिरते

इवलेसे नाजुक डोळे,
गर्दकाळ्या केसांवर नजर पडते
हसऱ्या चेहऱ्यावर तुझ्या
मन माझे भुलते…….

दरवेळी स्वप्नांत
धुंद तुझी असते
स्वप्नांत त्या
सावली तुझी दिसते

घेऊन तुझे स्वप्न
राञ नवी येते
तेच स्वप्न गिरवत मग
रात्र माझी जाते

 

रात्र माझी जाते

© *आकाश शिंदे*

Chapter List