Bookstruck

नजर दूर जाते, तिथे कुणीच नसते

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सिद्धेश्वर विलास पाटणकर
 
नजर दूर जाते
तिथे कुणीच नसते
एक आस लावून वाढवून घालमेल मनाची
भिरभिरते , पण तिथे कुणीच नसते
ते बांध मोडक्या मनाचे ,
भळभळून वाहणाऱ्या आठवणींचे असेच असतात
डोळे निरंतर तिला शोधत असतात
ती फसवते, कारण तिथे कुणीच नसते
एकटाच उभा असतो फुलवत स्वप्नांचे मळे
मन तुडुंब भरलेले विरहाने
वाट पाहतो , करतो अश्रू मोकळे
ती जागा , तो कट्टा आणि वर असलेले रिक्त आकाश सर्व चिडवतात
चिडवते ती एकत्र चाललेली वाटही
तरीही शोधतो तिला मी
पण तिथे कुणीही नसते
याचना करतो नजरेस मी पुन्हा, एक वेडी आस लावूनी
ती हसते , पुन्हा जाते दूरवर
भिरभिरते ,शोधते , नि परतते रिक्तहस्ते
कारण , तिथे कुणीही नसते
आजही शोधतो तिला मी करुनी नाना बहाणे
आता नजरसुद्धा मला चिडवते
माझ्यावर हसते
कारण … कारण … तिथे कुणीच नसते

« PreviousChapter ListNext »