स्मारक
स्मारक हवं कि स्मरण हवं!....
ऐकला का आता स्मारक ऊभारणार!
रायगड, तोरणा, पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग, हे सगळ काहा आम्हा विसरणार!.
आणि आम्ही आता फक्त नि फक्त स्मारक ऊभारणार!!
पुरंदरचा वेढा, अफजुल्याचा कोथळा, आग्राची भेट, शाहीस्त्याची बोट, हे सगळ फक्त पानावर राहणार!
आणि आम्ही आता फक्त नि फक्त स्मारक ऊभारणार!!
घोड्यांच्या पागा, किल्ल्याची तटबंदी,मावळ्यांची शिबंदी.,हे सगळ आता फक्त स्मरणात राहणार!
आणि आम्ही आता फक्त नि फक्त स्मारक ऊभारणार!!
शिवरायांची समाधी, जिजाऊंचा वाडा,अष्टप्रधान मंडळ हे सगळ आता आम्ही विसरणार!
आणि आम्ही आता फक्त नि फक्त स्मारक ऊभारणार!!
ईतिहासप्रेमींसाठी दस्ताऐवजे, शस्त्र प्रदर्शने, गडकिल्यांचे संरक्षण हेे सगळ कधी हो करणार!
आणि आम्ही आता फक्त नि फक्त स्मारक ऊभारणार!!
शिवरायांचा ईतीहास,संभाजीराजांच बलिदान, संताजी धनाजीची पराक्रम, हे सगळ त्या समुद्रात जाणार!
आणि आम्ही आता फक्त नि फक्त स्मारक ऊभारणार!!
कवि - तुषार साहेबराव पा नवले
८३०८६८१९८०