अपूर्वच यंत्रा, तुझी जादुगिरी !

अपूर्वच यंत्रा, तुझी जादुगिरी

तुझी कारागिरी काय वानू !

हवेत पांगल्या गायनलहरी

घेतोस अंतरी आकळूनी

कळ फिरविता पुन्हा ऐकवीसी

संतुष्ट करिसी चित्त माझे

मानव-मतीचा अद्‍भुत विलास

विश्व आसपास बोले, भासे

निगूढ संगीत गाती ग्रहलोक

येईल का बोल ऐकू मला?