Bookstruck

प्रेमाची आई

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

प्रेमा.... एक सतत चांगलं घडावं म्हणून धडपडणारी अभागी आई, बायको, बहीण, मुलगी

ही एक सत्य कथा असून ओळख लागू नये म्हणून व्यक्ती तसेच ठिकाणांचे नाव बदलण्यात आले आहेत, तसेच ही गोष्ट बऱ्यापैकी मोठी आहे, तेव्हा मी ती आपल्या समोर वेगवेगळ्या भागातून मांडणार आहे.

तर ही गोष्ट सुरू होते शेवाळवाडी या छोट्याश्या गावी, सन 1947 चा काळ सुरू होता, देशात स्वातंत्र्य संग्राम सुरू असताना हे गाव मात्र निजामाच्या अधिपत्याखाली होते. अशातच गावातील पाटील घराण्यात विमल चा जन्म झाला. गावातील पाटलांचे शेंडेफळ (सगळ्यात लहान ) म्हणून तिचा लाड सर्वात जास्त. बाबासाहेब पाटील शेवाळवाडी मधले एक प्रतिष्ठित गृहस्थ वडिलोपार्जित असलेली शेकडो एकर जमीन त्यांनी अत्यंत प्राणपणाने जपलेली. गावातील लोक ज्या जमिनीवर राहत ती सुद्धा त्यांच्याच मालकीची पण अत्यंत उदारपणे त्यांनी त्या जमिनीवर गावातील लोकांना राहू दिले कालांतराने त्या जमिनी त्यांच्या नावे केल्या. त्यांच्या पत्नी लक्ष्मी बाई नावाप्रमाणेच लक्ष्मी पण अत्यंत हुशार, चार अपत्यांपैकी ही विमल अगदी देखणी चुणचुणीत आणि सर्वांची आवडती, बाबासाहेबांचा तर तिच्यावर विशेष जीव, तिच्याशिवाय त्यांना जेवण सुद्धा जात नसे. एवढा लाड असून सुद्धा विमल आई च्या कडक शिस्तीत वाढली, आईने तिच्यावर खूप चांगले संस्कार केले. त्याकाळी मुली 13 - 14 वर्षाच्या झाल्या की त्यांचे लग्न केले जात होते, विमल ची मोठी बहीण कमल हिचे शिरगाव येथील रामराव जाधव ह्यांच्याशी लग्न जमले, 40 तोळे सोने, 50 हजार रुपये (त्याकाळचे) देऊन हे लग्न शेवाळवाडी मध्ये पार पडले ह्याच लग्नात धवळपुरी गावचे दत्तराव देशमुख यांनी विमल ला आपला मुलगा श्रीकिशन ह्याच्यासाठी बाबसाहेबांकडे मागणी घातली. अगदी दोन महिन्यात हा विवाह करण्यात आला. 10 एकर बागायती जमीन आंदण म्हणून तसेच श्रीकिशन शेती करीत असल्यामुळे 1 बैलजोडी आणि 2 दुभत्या गाई तसेच 20 हजार हुंडा देण्यात आला. विमल गेली आणि बाबासाहेबांचे तसे ग्रहच फिरले.

क्रमशः

Chapter ListNext »