प्रेमाच्या आईची संघर्ष कथा

याआधीच्या भागात आपण बाबासाहेब पाटील यांचे शेवाळवाडी मधील वैभव आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेतले, विमलचे लग्न झाले बाबासाहेबांचे ग्रहच फिरले, विमल जशी घरातून गेली त्याच्या बरोबर एक महिन्यांनी गावातील काही नीच लोकांनी कपटी कारस्थानं रचले त्यांच्या वाड्यात चोरी केली गेली, आणि त्यांना तक्रार करण्यासाठी म्हणून निजाम दरबारी हैद्राबाद येथे घेऊन गेले, येते वेळी त्यांच्या चहा मध्ये विष टाकले, तेव्हा त्यांना उलट्या झाल्याने (विषाच्या प्रभावाने) दवाखान्यात दाखल केले ट आणि गावात बातमी पसरविली की पाटलांना बरे वाटत नाहीये त्यामुळे त्यांना दवाखान्यात पाठविले आहे.

तेव्हा त्यांचे धाकटे मुलगे यशवंतराव त्यांना आणण्यासाठी गेले. पण ते हैदराबादला पोचण्यापूर्वीच बाबासाहेबांची प्राणज्योत मालविली होती. त्यांचा तो निष्प्राण देह पाहताच यशवंतरावनी हंबरडा फोडला, स्वतःला कसेबसे सावरत त्यांनी तो मृतदेह गावी आणला, सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूच्या गावातील लोक शेवाळवाडी मध्ये गर्दी करू लागले कारण माणसात देव असणारे ते बाबासाहेब एकटेच होते असे लोक म्हणत. ह्याचा एक परिणाम झाला की बाबासाहेबांचे थोरले पुत्र माधवराव ह्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, त्यांना वेडाचे झटके येऊ लागले, अश्या परिस्थितीत लक्ष्मी बाईंनी कमल आणि विमल ह्यांना सांगावा पाठविला, कमल ला तो सांगावा लवकर मिळाला पण विमल ला तो सांगावा मिळायला खूप उशीर झाला. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला खूप मोठी गर्दी झाली होती, संपूर्ण गाव दुःखाच्या छायेत लोटला होता. विमल ला यायला वेळ होत होता आणि रीतिरिवाज उरकून घ्यावा म्हणून लोकांनी आणि नातेवाईकांनी अतिशय जड अंतकरणाने बाबासाहेबांचे क्रियाकर्म उरकले.

आपल्या लाडक्या पित्याचे एकवार दर्शन सुद्धा विमल करू शकली नाही, आईच्या, बहिणीच्या आणि दोन्ही भावांच्या खांद्यावर भार टाकून तिने जेव्हा हंबरडा फोडला तेव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या काळजाचे पाणी - पाणी झाले. दोन महिने माहेरी राहिल्यावर श्रीकिशन तिला न्यायला आले, अतिशय जड अंतकरणाने तिने माहेर सोडले.

सासरी सासरे दत्तराव देशमुख सासू बायजाबाई आणि मोठी जाऊबाई मायाबाई यांच्या छत्राखाली विमल सर्व घरकाम शिकली, चार दीर, तीन नणंदा ह्यामध्ये श्रीकिशन तिसऱ्या क्रमांकाचे, घरात दूध-दुभत्याची काही कमी न्हवती, बघता बघता दिवस निघून गेले आणि वयाच्या सतराव्या वर्षी तिला पहिल्यांदा दिवस गेले, ही बातमी प्रथम तिच्या सासूबाईंना कळाली, विमल ला होणाऱ्या कोरड्या उलट्या तसेच तिची आंबट पदार्थ खाण्याबद्दलची आवड यावरून त्यांनी अंदाज बांधला आणि तो खरा निघाला त्यांनी मोठ्या आनंदात विमलला साखर खाऊ घातली, देवापुढे दिवा लावला आणि त्याचवेळी देवाला मनोभावे प्रार्थना केली की विमल ला मुलगाच होऊ दे कारण विमलच्या मोठ्या जावेला दोन्ही वेळी मुलीच झाल्या होत्या आणि तसे त्यांनी विमलला पण बजावले. अतिशय आनंदाने त्यांनी ही बातमी दत्तरावांना सांगितली, दत्तराव पण खूप खुश झाले, त्यांनी मोठ्या हर्ष उल्हासाने हा सांगावा शेवाळवाडीला पाठवला.

(क्रमशः)