Bookstruck

प्रकरण १

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

संध्याकाळचे ६ वाजले होते. लोकांची कामावरून घरी परतायची वेळ झाली होती. रस्त्यावरील वाहनांच्या आवाजामुळे बसमधील राहुलची झोपमोड झाली.त्याचा स्टॉप जवळ येत होता. तो डोळे चोळत उठला. आपली ब्याग घेउन बसच्या दाराजवळ उभा राहीला. बस थांबल्यानंतर राहुल बसमधुन खाली उतरला आणी आपल्या घराच्या दिशेने निघाला. राहुल थोडासा दूर गेला असेल तेवढ्यात धडाम धुम्म असा मोठा आवाज आला. राहुलने वळून पाहीले एका ट्रक आणी कारचा भीषण अपघात झाला होता. तो अपघात एवढा भीषण होता की कारमधील सर्वजणांचा जागीच म्रुत्यु झाला होता. तो ट्रकचालक मात्र पळून गेला होता. राहुलने त्या ठिकाणी जाऊन पाहिले कारमधील लोक ट्रकच्या खाली चिरडले गेले होते. ते भयानक द्रुश्य राहुलला पाहवत नव्हते. त्याने तिथून काढता पाय घेतला.
                                                                 क्रमशः
                                    

Chapter ListNext »