प्रकरण २
<p dir="ltr">राहुल तेथुन निघणार तोच त्याचे लक्ष समोर थोड्याच अंतरावर उभ्या असलेल्या माणसाकडे गेले. तो राहुल कडेच पाहत होता. साधारण चाळिशीतल्या दिसणार्या त्या माणसाने वेगळ्याच प्रकारचे कपडे घातले होते. तो राहुल कडे पाहुन हसला. त्याच्या हातात न्युजपेपरचा एक रोल होता. त्याने राहुलला बोलावल. पण तो कुणी वेडाबिडा असेल अस समजुन त्याच्याकडे दुर्लक्ष करून राहुल जाण्यासाठी वळला. तोच तो माणूस चक्क त्याच्यासमोर उभा होता. राहुल दचकला. तो माणूस लगेच तिकडून इकडे कसा आला याचे राहुलला आश्चर्य वाटले. तो माणूस राहुल कडे बघुन मिश्किल पणे हसला.<br>
                                                               क्रमशः</p>
                                                               क्रमशः</p>