Bookstruck

परी गं परी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अरुण वि.देशपांडे - पुणे
मो-९८५०१७७३४२

परी गं परी माझे एक काम करी
बरं नाहीये आईला ,तिला बरे करी

परी गं परी तुला सांगतो एक काम
डोक दुखतंय आईचे ,लाव बरं बाम

परी गं परी अजून एक काम आहे
एकट्या आजोबांना सोबत करायची आहे

परी गं परी गं  आपण दोघे एक काम करू
रस्ता ओलांडण्यासाठी सर्वांना मदत करू

परी गं परी मला वाटे आपण एक करावे
ज्यांना नाही कुणी , आपण त्यांचे व्हावे

« PreviousChapter ListNext »