स्वप्ने पहा (see dreams)
या जगात देवाने सर्वानाच स्वन पाहण्याचा अधिकार दिलेला आहे .कारण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची क्षमता आहे. पण या जगात फारच थोडे असे लोक आहेत जे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले आहेत .
तुम्ही स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी होईल ते प्रयत्न करा . आणि एक म्हण आहे प्रयत्नांती परमेश्वर .जेथे परमेश्वर आहे तेथे यश हे आहेच. काही लोक म्हणतात झोपेत पाहीलेले स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पण हे सत्य नाही कारण प्रत्येक स्वप्नाची सुरवात ही झोपेतच होते .
कोणीतरी चंद्रावर जाण्याचे स्वप्न पहिलेच असेल तेव्हाच कोणाच्या तरी मनात ग विचार आला असेल त्या मुळेच निल आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेऊ शकला.
प्रत्येक भारतीय व्यक्तीला च नव्हे तर पूर्ण जगाला माहीत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जेव्हा दिल्ली सोडून मुंबईला आला तेव्हा तो फुटपाथ वर उभा राहून म्हणाला "मला याच शहरात लोक किंग म्हणतील "आणि आज त्याला संपूर्ण जग "किंग खान" च्या नावाने ओळखतात.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले नसते तर ते कधीच स्वराज्याचे संस्थापक झाले नसते.
आपण तेच स्वप्न पहा जे पूर्ण करण्याची आपल्यात क्षमता आहे .पण क्षमता ओलांडली जाते हे लक्षात ठेवा .
तुमचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होउ शकतात जेव्हा तुम्ही त्यांना "सास लेना जितना जरूरी है उससे ज्यादा आपके सपने इम्पोर्टेन्ट हो जाने चाहिए"
मी शेवटी एकच सांगू इच्छितो की
"मंजिले बड़ी जिद्दी होती हैं,
हासिल कहा नसीब से होती हैं,
मगर वहां तूफान भी हार जाता हैं,
जहा कश्तियां जिद पर होती हैं।