Bookstruck

मृगजळपरी फक्त तिचाच भास होतो

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

आजकाल मृगजळपरी
फक्त तिचाच भास होतो....

न ऐकता काही
मी उगाच हसत बसतो....
आजकाल मृगजळपरी
फक्त तिचाच भास होतो....

बघताच तिला मी
स्वतःलाच सावरत बसतो.....
मी कसा दिसतो म्हणून
मित्रांनाच सतावत बसतो
आजकाल मृगजळपरी
फक्त तिचाच भास होतो....

स्वप्नामंदी पाहून तिला
दचकन कसा जागा होतो....
अरं रं हे तर साधं स्वप्न होत
अशी समजूत मनाची काढत बसतो...
आजकाल मृगजळपरी
फक्त तिचाच भास होतो.….

रुसवे फुगवे काढता काढता
मीच मला का बदलत असतो.....?
आवडावे तिला म्हणून जणू
अशाच काही कविता करतो
आजकाल मृगजळपरी
फक्त तिचाच भास होतो.....

.…............................….........................................
     
   कवी- पवन बागल .
  मोबा.-७०५७९२२४१४

Chapter ListNext »