जागतिक पाचन स्वास्थ्य दिन
उत्तम आहार उत्तम पेय
सर्वांनी करावे प्राषण
बिघडवू नये निकृष्ठ अन्नाने
आपल्या शरीराचे पोषण
सुस्थितीत चालेल आपली संस्था पचननिरोगी शरीराला द्या,उत्तम आहाराचे वचन !!
शरीराला लावावे एकच व्यसन
रोज एक तास करावी योगासन
होऊ नये शरीराचे कुपोषण
करावे दिवसातून तीन वेळा जेवण
सुस्थितीत चालेल आपली संस्था पचननिरोगी शरीराला द्या,उत्तम आहाराचे वचन !!
उघड्यावरील अन्न खावु नये
जंताना आमंत्रण देवू नये
हातांची नखे कधी वाढवू नये
विना दात घासता कधी जेवू नये
सुस्थितीत चालेल आपली संस्था पचननिरोगी शरीराला द्या,स्वच्छतेचे वचन !!