कादंबरी
:प्रस्तावना:
नमस्कार मित्रहो! मी विनय डोळसे आपले खूप खूप स्वागत करतो,माझ्या पहिल्या वहिल्या लेखनप्रपंच्यामध्ये अर्थात या कादंबरीचा लेखक तसेच निवेदक म्हणून मी प्रस्तावना देतो आहे.
प्राथमिक पातळीवर म्हटले तर लोकांना काही वाईट प्रवृत्ती जडलेल्या असतात.त्यांपैकी उदाहरणे द्यायची झाली तर खूप देवू शकतो पण देणार नाही कारण कोणावरही टीका करण्याचा हेतू माझ्या मनात नाही किंवा मला तशी सवयही नाही.
अंधश्रद्धा या एकाच शब्दामुळे संपूर्ण विश्वातील मनुष्यजमातीस खूप दयनीय जीवन जगावे लागते आहे आहे. जो ईश्वर पूर्वी लीकांची मदत करण्याचे ढोंग करायचा तो ईश्वर न जाने आजकाल काय करतो आहे, त्याला साधे ढोंगहि करणे होईना मग तो करतोय तरी काय???
हा यक्षप्रश्न पडला तरी याचे उत्तर अंधश्रद्धेचे प्रसारक सुद्धा जाणून नाहीत.हे कोण आहेत याचे उत्तर आपणांस कळेलच ते कादंबरी वाचल्यानंतर..
या कादंबरीचा नायक हा कली आहे.आपल्या पित्याच्या शोधात भटकणारा कली भरपूर दुख सहन करतो हजारो वर्ष जखडलेल्या अवस्थेत राहतो आणि सुटून जान बदलतो कादंबरी वाचताना थोडा कोणाचातरी राग येतो खरा पण नंतर ते अधिक वाचायला होते.
हि कादंबरी south corea, उत्तर भारत, हिमालय, बंगाल, बिहार, पूर्व भारत, चीन, गुजरात, इत्यादी प्रदेशातील घटनाक्रमावर आधारित असून यातील घटना, स्थान, स्थळे, पत्रे, व्यक्ती, नावे, संवाद, कथा इत्यादी पूर्णपणे काल्पनिक असून याचा संबंध कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी नाही आहे. जर काहीही संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा.
एक गोष्ट सांगतो या कादंबरीतील घटना जर तुमच्या मनाला लागल्या तर मी वयक्तीकपणे तुम्हाला माफी मागतो कारण कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही.कोणीही स्वतःचे मन विचलित करू नये..
जास्त काही न बोलता इथेच थांबतो
धन्यवाद!...........
कादंबरी ज्याच्यावर आधारित आहे अश्या कलीला.........
कलीचे पिता महान सुमेधांना ..............
ज्यांच्यामुळे लिहिण्याचे बळ मिळाले अश्या मातापित्याला .....
मित्र म्हणून आकाशदिपला............
आणि या सर्वानंतर ज्याने जास्त मेहनत घेतली अश्या मला स्वतःला .......
मी हि कादंबरी अर्पण करतो आहे...................................................