भाग 1
माझी कथा
धरणातले गाव
लेखक :तेजस भोसले
सकाळी सकाळी माझा उठायचा मूड नव्हता. आणि माझ्या मनात पण नव्हतं .रात्री दारातल्या लिंबा खाली झोपलो होतो . तसाच पडून मी अंथरुणात लोळत होतो. आणि वारा पण गार सुटला होता . पक्षांचा चांगलाच किलबिलाट सुरू होता. सूर्याची तिरपी किरण माझ्या डोळ्यावर पडत होती आणि लिंबाच्या झाडाच्या बुंदयावर पडली होती. तवा त्याचा तपकिरी रंग आता सोनेरी वाटू लागला होता. आणि लिंम्ब बी मीच राजा या अवेशात डोलत होता. माज्या शेजारची मित्र मंडळी कवाच उठुन आपल्या उद्योगाला गेली होती .आणि राहिलो होतो मीच एकटा पण आता मला भी उठलं पाहिजे म्हंटल ,कारण माझ्या बाची कवाच पहिली हाळी आली होती. "ए उठ की र, तुझा बा श्यान घाण काढणार हाय वि र ?
तस आमच्या बापू न म्हंटल तरी मी काय उठलो नव्हतो .
पण तुम्हाला सांगायचं म्हंजी आमच्या बापूच्या एक नियम हाय एखादयाला तीन वेळा बोलवायच आणि चवथ्या वेळ ला बरोबर चप्पल फेकून मारायचं .
मीच मनाला म्हंटल होत एक दिल्या नवका अजून 2 बाकी हायती च की . पण आज बापू न दुसऱ्याच हाळीला वार्निग दिली
"ये बेण्या उठ का हणू येऊन"? म्हणलं खरच इल आणि एखाद्या नव्या तरण्या सूनन सासू वरचा राग कपड्या वर काडावा तसा मला कुंदल कुंदल कुंदलील उठलंच पाहिजे म्हंटल, आणि उठलो पण मी उठायचं म्हंटल आणि मी रात्री संरक्षण कवच घेतले होते की नाय अंगावर मजी माझी गोधडी या मध्ये माझा पाय आणि हात दोनी बि अडकलं होत. आव अडकणार च की . नाय कस सांगा तिला बी शत्रूला बगाया दुर्बिन्या लावाव्या तश्या दोन भली मोठी होल होती. मग मी पण आयडिया करायचा एक होल दोसक्यात अडकवायचा, आणि दुसरं पायात . याचा एक फायदा असायचा. माझी वाकाळ रात्रीच्याला कोण वडायच नाही .
आव आमच्या इथं हातरुणा साठी लय वडा वडी . ती सखीच गोट्या रात्रीच फुल पिऊन यायचं आणि ज्यो कोण झोपला असलं त्याच वडायच. मग ती बसायचं थंडीत आणि ह्यो झोपणार .असच चालायचं मग माझं कोण वडायचंच नाय आता कसा तरी मी माझ्या कवचातुन बाहेर आलो. वैशाख महिना चालू होता दुपारी ऊन आणि पहाटे थंडी वाजायची
पण त्या उनाचा माझ्या गावावर नकबर बी फरक पडायचा नाही. आव कसा पडणार माझा गाव एखाधी गवर नटवावी आणि तिला हिरवा शालू नेसावा तसा हीरवा गार होता .सकाळी 4लाच उठून सगळे कामाला लागायची बायका जात्यावर दळण दळायच्या. दगडी जाती आणि त्यावर पडणारा सखू मावशी लता काकू आणि बाकीच्या बायका दळण दळताना खूप छान गीत गायच्या .
मला त्यातलं अजून आठवतय
माझ्या भावाच्या गावाला वाट जाती डोंगरातली ...
डाळ दळती मी आठवण काडती म्हयारची..
साथ दे र पांडुरंगा निरुप दे माझ्या बापा ..
सखू राहती सुखान त्याला भी सुखी ठेव आनंता ...
डाळ दळती मी ग मुगाची
आठवण आली गा माय बापाची ...
अस तिझ सुरेख गीत कानावर पडलं की मला भी रडू यायचं .
असा माझ्या गावचा पसारा चालू होता मी पण उठून आता कामाला लागलो होतो लगीन घाई सुरू होती .गावातली जाणती मांनस जमल त्याची लग्न जुळवाय माग होती . मी पण माझ्या लग्नाची अशीच वाट पाहत होतो .आज अप्पा कुणाचं तरी स्थळ घेऊन आमच्या गलीकड जाताना दिसला .
क्रमशः