पहिला पाऊस
पावसाळ्याचा तो पहिला पाऊस,
असं वाटतं ह्या पावसात भिजून चिंब व्हावं.
आणि आनंदाने नाचाव.....
पहिल्या पावसासाचा तो गारवा खूप रोमांचक असतो,
शरीराला एक वेगळा अनुभव देऊन जातो.
त्या पहिल्या पावसामुळे आलेला मातीचा सुगंध खूपच वेगळा असतो....
असं वाटतं ह्या सुगंधाचा आनंद घेतच रहावं.
ते जोऱ्याचे वाहणारे ते वारे,
शरीराला थंडावा देऊन जातात.
ह्या पहिल्या पावसामुळे शरीरात,
वेगळीच हालचाल चालू असते,
ती म्हणजे अति आनंदाची....
हा पहिला पाऊस सर्वांची धावपळ पण करतो,
कोणाचं काही काम राहिलेलं असतं तर कोणाचं काही.
म्हणून सर्वजण ते काम आटोपण्यात धावपळ करतात.
म्हणून खरंच हा पहिला पाऊस खूपच वेगळा आणि रोमांचक असतो.
आणि तो सर्वांनी एकदा तरी अनुभवला पाहिजे....