Bookstruck

दत्ताची आरती - आरती ओवाळीतो जय जय दिगंबर...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आरती ओवाळीतो जय जय दिगंबरा दत्ता, मंदमती मी पातकी देव तारीम मज आतां ॥ धृ. ॥

दंडकमंडलु हस्तीं शोभत तुझिया गुरुनाथा ॥

पापी जन हें बहु उद्धरले गुण तुझे गातां ॥ १ ॥

ध्यानी आणुनि तुजला दत्ता रुप तुझें पाहतां ।

आनंदाने तल्लिन मन माझें आता ॥ २ ॥

दत्त दत्त हें वदनिं नित्यही नाम तुझें घेतां ।

भवसागरिं तारिशी त्यातें शरण तुला आतां ॥ ३ ॥

कृष्णातिरिंच्या कुरवपूरी तूं वससी गुणवंता ।

दर्शनमात्रें तरती प्राणी हरिशी भवचिंता ॥ ४ ॥

इच्छा मनिंची पूर्ण करिशि बा तूंचीं गुरुदत्ता ।

हरि तव चरणी लीन सर्वदा रक्षी गुरुनाथा ॥ ५ ॥

« PreviousChapter ListNext »