Bookstruck

आनंदे उदो बोलणें भवानीचा ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
आनंदे उदो बोलणें भवानीचा ॥ धृ. ॥
नवरात्री घट मांडू । दिवे ओवाळूनी सांहूं ॥
कळिकाळा संगे भांडूं । वर देई वंशाचा ॥ १ ॥
नाचूं अंबेचे अंगणी । गोंधळ घालूं वो साजणी ॥
शरण येऊ लोटांगणी । कायावाचामनेसाचा ॥ २ ॥
अंबा नांदे सर्वां ठायी । अशी सर्वत्राची घाई ॥
मध्वनाथ म्हणे आई । वर देई वंशाचा ॥ ३ ॥
« PreviousChapter ListNext »