Bookstruck

सगुण हे आरती निर्गुण ओंवा...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सगुण हे आरती निर्गुण ओंवाळूं ।

कल्पनेचें घृत घालूं दीप पाजळूं ॥ १ ॥

ओंवाळूं आरती सद्‌गुरुनाथा; श्रीगुरुनाथा ।

भावे चरणकमळवरी ठेविला माथा ॥ धृ. ॥

अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडूं ।

आशा मनशा तृष्णा काम क्रोध कुरवंडू ॥ २ ॥

सद्‌गुरुचे पूजन केले षोडशोपचारी ।

रामानंद जीवन्मुक्त झाला संसारी ।

ओंवाळूं आरती. ॥ ३ ॥

« PreviousChapter ListNext »