Bookstruck

That's my pleasure..

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आनंद पैशात मोजू शकत नाही

That's my pleasure..

मुलाने Honda ची Activa घेतली आणी गेले वर्ष भर pleasure तशीच पडून राहीली म्हणून मी OLX वर pleasure sell ची add टाकली ,'want to sell 30000'.....

कुणी 15 हजारात मागितली, तर कुणी 26, तर एकाने 28 हजार मधे मागितली. पण मी जास्त पैसे येतील या अपेक्षेने कुणालाच 'हो' म्हणलो नव्हतो..

थोड्या वेळाने एक काॅल आला आणी तो म्हणाला.., "साहेब 30 हजार जमवण्याचा खूप प्रयत्न केला पण 24 हजारच जमलेत. थोडं थांबा मोबाईल विकतो आणी किती पैसे येतात ते बघतो पण pleasure मला द्या... माझा मुलगा इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे. शेवटचे एक वर्ष तरी त्याने गाडी वरून जावे असे मला वाटते."

मी फक्त 'ok बघू' असे म्हणालो आणि फोन ठेवला...

नंतर थोडा वेळ विचार केला आणि call back करून बोललो, "मोबाइल विकू नका. ऊद्या सकाळी या आणि गाडी घेवून जा, फक्त 24 हजार मधे......"

माझ्या समोर 28 हजार ची आॅफर असताना पण मी त्या व्यक्ती ला 24 हजार मधे pleasure देतोय....आज आणि आता त्या कुटूंबात किती आनंदी वातावरण असेल..? उद्या त्यांच्या घरी pleasure येणार ......

आणि या मधे माझे काहीच loss नाही कारण मला परमेश्वराने खूप काही दिले आहे. आणि मी खूप समाधानी आहे माझ्या लाईफ वर .......

आज 100,500 च्या नोटांची जुळवा जुळव करून ती व्यक्ती 5 वाजता माझ्या कडे आली. सकाळ पासून पाच वेळा फोन, 'साहेब मी पैसे घेवून येतोय गाडी कुणाला देवू नका..'

माझ्या हातात पैसे दिल्यावर त्या वेगवेगळ्या नोटा बघून जाणीव झाली की ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणा वरून गोळा करून आणलेत.

चार हजाराचा तोटा पत्करून पण आम्हाला काहीच वाईट वाटले नाही उलट त्याच पैशातील 100 रू ची नोट काढून त्या व्यक्तीला देत माझी पत्नी म्हणाली घरी जाताना मिठाई घेवून जा....

डोळ्यात पाणी आणत त्यांनी आमचा निरोप घेत तो माणूस pleasure घेऊन गेला...

आपण सहज reply करतो 'That's my pleasure' पण आज pleasure bike विकताना कळलं...

Pleasure म्हणजे काय...

« PreviousChapter ListNext »