Bookstruck

श्रीकृष्णाची आरती - वांकी चरणीं धरणी रांगसि य...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वांकी चरणीं धरणी रांगसि यदुतरणी ।

तरुणी मोहिसि फोडिसि भरणी सुखकरणी ॥

पाणी डहुळिसि चोरिसि लोणी मृदुवाणी ।

लोचनबाणें भुलविसी रमणि व्रजरानीं ॥ १ ॥

जय देव जय देव जय गोकुळपाला ।

नवघननीळा गोपबाळांतें पाळा ॥ धृ. ॥

खुळखुळखुळ वाळे घुळघुळ घागरिया ।

क्षुणक्षुण क्षुद्रघंटा वाजति साजितिया ॥

झळझळ पिंपळपान भाळी गोजिरिया ।

अलिकुलकुटील सुनील जावळ सांबळिया ॥ २ ॥

दुडुदुडुदुडु रांगसि हांससि मग बससी ।

सस्मितवदने विस्मित मन हरिसी ॥

धरिसी भिंती उठती चालसि मग पडसी ।

दडसी मातेपासीं पंडितप्रभू जडसी ॥ ३ ॥

« PreviousChapter ListNext »